(गीति)
हे देवा आपण जें, त्यागावें नी स्वकर्म करण्यास ।
ऐसें दोनींविषयीं, सांगितलें तें मला कळायास ॥१॥
कळलें दोनींविषयीं, परंतु त्यांतिल सुयोग्यसें सांगें ।
१.
श्रेयस्कर तें असुनी, निश्चितसें एक ठरवुनी वागें ॥२॥
देव म्हणे नृपनाथा, कर्मांचा त्याग आणि स्वीकार ।
२.
मोक्षास साधनें हीं, योग्य परंतू करीन स्वीकार ॥३॥
जो भेदबुद्धिपासुन, होणारें दुःख सोशितो सारें ।
न करि द्वेष नि इच्छा, तो त्यागी सौख्य सर्वदा सारें ॥४॥
बंधापासुन होतो, तत्कालीं मुक्त मनुज हे राया ।
३.
ऐकें पुढील गोष्टी, त्यापरि वागें सुबोध परिसे या ॥५॥
अल्पसमंजस आणिक, अज्ञानी त्याग आणि स्वीकार ।
मानिति फलेंहि त्यांचीं, अलग अशीं असति जाण साचार ॥६॥
असति समंजस मानव, दोनींतुन एक मानिती प्रमुख ।
४.
वर्तति त्यापरि भूपा, मिळविति फल हें तसेंच हें देख ॥७॥
जें फल त्यागापासुन, मिळतें तें योग साधुनी मिळतें ।
५.
योगास कर्मसंग्रह, म्हणती तो योग जाण तो त्यातें ॥८॥
कर्माच्या त्यागाला , ज्ञाते म्हणती न त्यास संन्यास ।
इच्छारहीत कर्मे, करितो त्यालाच वदति संन्यास ॥९॥
येणेंपरि वर्ते जो, तो होतो ब्रह्मरुपसा योगी ।
६.
ज्ञात्यांचें हें आहे, सांगे मत तें सुभक्त तुजलागीं ॥१०॥
योगाविषयीं उत्सुक, आत्मा केला तदर्थ वश ज्यानें ।
चित्ताची शुद्धी नी, जिंकुन इंद्रियं समस्तही त्यानें ॥११॥
केलें कर्म तयानें, अलिप्त राहे करुन कर्मांसी ।
७.
ज्ञाते तयास म्हणती, मीही म्हणतों तयास संन्यासी ॥१२॥
जे कर्म करुन आपण, केलें आहे असें न मानीती ।
मन आणिक इंद्रियें हीं, एकादश तीं स्वकर्म करिताती ॥१३॥
ऐसा जो वागे तो, भूपा समजें तयास तूं योगी ।
८.
तो तत्त्वविदहि असतो, विशेष गुण-युक्तसा असे योगी ॥१४॥
इंद्रियकृत कर्माला, जो अर्पी तो करुन कर्मासी ।
नोहे लिप्त तयाला, ज्ञाते म्हणतात यास संन्यासी ॥१५॥
सूर्याचें बिंब जसें, दिसतें उदकामधेंच सर्वांसी ।
९.
उदका लिप्त न होई, तैसा मिश्रित सुपुण्य अघ ऐसी ॥१६॥
केवळ योगी जन जे, इच्छा सोडून स्वबुद्धि शुद्ध अशी ।
धारण करुन ते हे, याच प्रकारें करुन कर्माशीं ॥१७॥
काया वाचा बुद्धी, कर्मेंद्रियं नी मनेंचि कर्मांसी ।
१०.
करिती योगीजन जे, कथितों भूपा तुला कळायासी ॥१८॥
जो योगहीन मानव, फलइच्छेनें करीतसे कर्म ।
११.
तो कर्मबद्ध होतो, दुःखानें पावतो कथीं वर्म ॥१९॥
स्वमनें योगी त्यजुनी, सारीं कर्में सुखास तो मिळवी ।
१२.
उत्तम नगरीं राहून, अपुल्यापरि तो जनांसही शिकवी ॥२०॥
मीही कोणा ठायीं, कर्तृत्वादी क्रिया न निर्माण ।
संपर्क तया बीजा, केल्या गोष्टी कदापि न च जाण ॥२१॥
शक्तींच्या योगानें, घडती गोष्टी अशा सहाजीक ।
१३.
अवधान पुढें द्यावें, प्रियकर भक्ता सुबोध हा ऐक ॥२२॥
मी विभु आहें भूपा, कोणाच्याही शिवें न पुण्यास ।
तैसेंच पाप न शिवे, कथितों भक्ता तुला कळायास ॥२३॥
मोहानें मोहित ते, अज्ञानें मूढ होति मोहित वा ।
१४.
नसती समर्थ राया, समजाया वरिल बोध अह उणवा ॥२४॥
ज्याचें आत्म्यावरचें, विवेक करुनीच नष्ट अज्ञान ।
१५.
होतें असेंच त्याचें, सूर्यापरि तें विकासतें ज्ञान ॥२५॥
ज्यांची माझे ठायीं, निष्ठा असते सदैव चित्तांत ।
१६.
माझे ठायीं ज्ञानें, रत असती ते अजन्म होतात ॥२६॥
विज्ञान-युक्त ज्ञानी, पाहति गो गजादि श्वानास ।
तैसेच पाहती ते, द्विज चांडालहि समस्त जातींस ॥२७॥
ऐसे ज्ञानि महात्मे, मानावे वा तसेच पंडित ते ।
१७.
गणपति वदती भूपा, ऐकें पुढती सुजाण बोधातें ॥२८॥
दोषरहितसे असुनी, सर्वत्रहि ते समान जो बघत ।
१८.
मिळविति ब्रह्मास अशा, त्यांना हें विश्व सर्व वश होत ॥२९॥
ऐसा मानव साधी, जीवन्मुक्ती करुन वर्तन हें ।
त्यातें योगि म्हणावें, जाणें भूपा सुबोध वचनीं हें ॥३०॥
सम-बुद्धीचा असतो, जाणुन ब्रह्मास आश्रया करि जो ।
आवडती नावडती, प्राप्ती होतां समान मानी जो ॥३१॥
त्याची बुद्धि न पावे, हर्षातें वा तसेंच द्वेषातें ।
१९.
कथितों सुबोध तूंतें, ठेवुन चित्तांत वागणें सुमतें ॥३२॥
भूपति वरेण्य पुसतो, त्रैलोकीं बा तसेंच सुरलोकीं ।
काय असें सौख्यातें, सांगा देवा कृपा करा भाकी ॥३३॥
कारण आपण आहां, समस्त विद्या सुपूर्णशा ज्ञाते ।
२०.
यास्तव विनवीं देवा, प्रश्न करा उघडासा कळायातें ॥३४॥
गणपति म्हणे वरेण्या, असती जे स्वात्मठायिं आसक्त ।
तैसेच तुष्ट असती, मुदितहि असती सुखांत अनुरक्त ॥३५॥
त्यांचे सुखनाशातें, पावत नाहीं नृपा असें समजें ।
२१.
जें सुख विषयांमाजी, तात्कालिकसें परंतु नच समजे ॥३६॥
विषयांपासुन सौख्यें, होती तीं जनन नाशशीं युक्त ।
२२.
दुःखाकारण होती, यास्तव ज्ञाते न होति आसक्त ॥३७॥
कायेपासुन क्रोधा, दूर करी जो तयास जिंकाया ।
२३.
यत्न करी तो होतो, पात्र सुखा त्या चिरायु भोगाया ॥३८॥
निष्ठा हृदयीं झाली, ज्ञानानें जो प्रकाश हृदयांत ।
पाडी तसाच गेला, संशय ज्याचा विरुन हृदयांत ॥३९॥
जो सर्वां भूतांचें, हित करितो तो सदैव ब्रह्मपदा ।
२४.
मिळवी सत्वर जो त्या, म्हणणें ज्ञाता नृपाळ हेच सदा ॥४०॥
शम-दम-युक्त असूनी, कामादिक शत्रु जिंकले साही ।
२५.
आत्मज्ञानी शोभति, ब्रह्मपदीं ते सुयोग्यसे पाहीं ॥४१॥
सोडुन समस्त विषयां, असनावरि बैसुनी वरी नजर ।
२६.
लावुन बैसे त्याला, प्राणायामक सुनाम मान्यवर ॥४२॥
प्राणापाना यांचा, रोध असे त्यास नाम शास्त्रांत ।
२७.
ऋषि प्राणायाम असे, म्हणती त्यांचे प्रकार त्री असत ॥४३॥
उत्तम मध्यम लघु हे, प्राणायामा प्रकार ते तीन ।
२८.
बारावर्णी भेदां, लघु म्हणती योगशास्त्रिं ते निपुण ॥४४॥
चोविसवर्णी मध्यम, उत्तम आहेत वर्ण छत्तीस ।
२९.
ज्यांत अशा यामांसी, करिती ते पावतीच सिद्धीस ॥४५॥
सिंह व्याघ्र मतंगज, यांना करिती सुलीन मानव ते ।
३०.
प्राणापानां यांना, साध्य करावें तयापरी त्यातें ॥४६॥
जैसे सिंहादिक ते, वश केले कीं न पीडिती कवणा ।
३१.
प्राणायामें दोनी, अघ दाहुन रक्षिती तनु जाणा ॥४७॥
जैसें उपरी वरती, चढुनी जावें अनुक्रमें पाथें ।
३२.
तैसे वायुहि दोनी, वश करणें हें उचीतसें येथें ॥४८॥
पूरक रेचक कुंभक, करुनी वायू प्रमूखशा नाडीं ।
अभ्यासावें भूपा, तीनहि जाणुन घेइ त्या नाडीं ॥४९॥
प्राणापानें कळती, भूत भविष्यहि समस्त या गोष्टी ।
३३.
ऐसा ज्ञाता होतो, भूपा ऐकें प्रसिद्ध ये सृष्टीं ॥५०॥
द्वादशवर्णीं उत्तम, प्राणायामास योजिती योगी ।
३४.
एकागर दोन अशा, सिद्धिसी धारणा करित योगी ॥५१॥
साधे योग तयांना, म्हणुनी योगीश धारणा नित्य ।
अभ्यासतात यास्तव, ऐकें भूपा सुभक्तिनें योग्य ॥५२॥
योग असा साधुन तो, त्रिकाळ गोष्टी घटीतशा जाणें ।
३५.
त्रैलोक्य त्यांस वश तें, होतें हें योग साधुनी जाणे ॥५३॥
ऐसे योगी असती, जग सारें ब्रह्मरुप चित्तांत ।
मानिति सदैव भूपा, ऐकें त्यांची स्थिती करीं श्रूत ॥५४॥
संन्यास योग दोनी, समान देती फळें अशीं मनुजा ।
३६.
ऐकें पुढील बोधा, सांगतसें तूं सुभक्तसा ओजा ॥५५॥
त्रैलोक्याचा स्वामी, व्यापुन आहें तयास मी एक ।
कर्मांचें फल दाता, हितकर्ताही जगांत मी एक ॥५६॥
ऐसें जाणुन मजला, जो भजतो तो सदैव भूपा हे ।
३७.
तो मुक्तीला पावे, सांगतसें मी तुलाच गीता हें ॥५७॥
चौथा प्रसंग यासी, नाम असे वैधयोग संन्यास ।
झाला पूर्ण असे हा, गणपति सांगे सुभक्त भूपास ॥५८॥
नमुनी सज्जन यांना, कथिली रचुनी स्वकाव्य ही गीता ।
चौथा प्रसंग येथें, समाप्त झाला गणेशशी गीता ॥५९॥
मोरेश्वरचरणाला, रचुनी अर्पीं यथामती गीतें ।
मोरेश्वरसुत म्हणतो, मानुनि घ्यावीं यथारुची शीतें ॥६०॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||
Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )