|| श्री स्वामी समर्थ ||
|| गणेश गीता ||
गणेशाच्या अवतारकार्यातील एक प्रसंग ज्यामुळे 'गणेश गीता' निर्माण झाली -
एके दिवशी गजाननाने पाराशरऋषीला सिंदूराच्या जुलमाने सर्व यज्ञयागादी कर्मे बंद पडल्याचे सांगितले व त्याच्या वधाची आज्ञा मागून तो आपली आयुधे घेऊन, शिव-पार्वतींचे आशीर्वाद गर्जना करीत सिंदूराच्या नगरापर्यंत आला. गर्जनेने सिंदूरासह सर्व दैत्य मूच्छित होऊन पडले. दूतांनी त्यास तू कोण आहेस, असे विचारले असता मी पार्वतीशंकरांच्या उदरी जन्मलेला व पाराशरऋषींच्या वात्सल्याने वाढलेला प्रत्यक्ष परमात्मा आहे व गर्विष्ठ झालेल्या सिंदूराचा वध करण्यासाठी आलो आहे, असे सांगून त्याने सिंदुराला युद्धास आवाहन केले.
नंतर गजाननाने आकाश भेदणारी मस्तके आणि पाताळे भेदणारे पाय, अनेक मस्तके, अनेक नेत्र, अनेक हात असे विराट रूप धारण करून तो सिंदूराजवळ आला असता सिंदूर भयभीत झाला. पण धीर धरून गजाननावर आपल्या हातांतील खड्गाचा प्रहार त्याने केला. तोच गजाननाने त्याला धरले आणि आपल्या अंगाने त्याचे अंग मर्दून टाकले. त्याच्या अंगातील तांबड्या रक्ताने गजाननाच्या अंगाचाही रंग तांबडा झाला. त्यामुळे त्याला 'सिंदूरवदन', ' सिंदूरप्रिय' इत्यादी नावे पडली. अशा तर्हेने गणेशाने उन्मत्त सिंदूराचा वध केल्यावर देवांनी त्याचा जयजयकार केला. नंतर सर्व राजे गजाननाच्या भेटीसाठी आले. त्यात वरेण्य राजाही होता. त्याने गणेशाच्या स्वरूपावरून आपण अरण्यात टाकून दिलेला आपला पुत्र हाच हे ओळखले. [हा कथाभाग गणेश पुराणांत आहे] आपल्या अज्ञानाबद्दल गणेशाची क्षमा मागितली. तेव्हा गजानन म्हणाले , वरेण्या, खेद करू नकोस. तू आणि तुझ्या पत्नीनं पूर्वजन्मी अति तीव्र तपश्चर्या केली आणि तुम्ही मला मोक्ष न मागता मी तुमच्या उदरी जन्मास यावं असा वर मागितलात, म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणं मी तुमच्या घरी आलो. आता मी निजधामास जातो. त्यावर वरेण्य म्हणाले , 'देवा, मला मोक्ष प्राप्त होईल असा काही उपदेश कर.'
त्यानंतर गजाननाने वरेण्याला योगमार्गप्रकाशक, सर्वसिद्धिदायक, अज्ञाननाशक आणि मनुष्यजीवनाचे उद्दिष्ट सांगणारी 'गणेशगीता' पुढीलप्रमाणे सांगितली. ती सर्वांनी पठण करण्यासारखी आहे. तिच्या श्रवणाने वरेण्य राजा जीवन्मुक्त होऊन मोक्षाला गेला.
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||
Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )