Shree Swami Samarth Nam:

|| श्री स्वामी समर्थ ||


|| गणेश गीता ||


॥ अथ दशमोऽध्यायः ॥

॥ अध्याय दहावा - उपदेशयोग ॥


श्रीगजानन उवाच -
दैव्यासुरी राक्षसी च प्रकृतिस्त्रिविधा नृणाम् ।
तासां फलानि चिन्हानि संक्षेपात्तेऽधुना ब्रुवे ॥ १ ॥
श्रीगजानन म्हणाले , दैवी, आसुरी आणि राक्षसी अशी तीन प्रकारची मनुष्यांची प्रकृति असते. तिची फळें आणि चिन्हें मी आतां संक्षेपाने सांगतो. १.

आद्या संसाधयेन्मुक्तिं द्वे परे बन्धनं नृप ।
चिन्हं ब्रवीमि चाद्यायास्तन्मे निगदतः शृणु ॥ २ ॥
हे नृपा, यांपैकी पहिली मुक्ति प्राप्त करून देते व दुसर्‍या दोन बंधन प्राप्त करून देतात. पहिलीचे चिन्ह मी सांगतों तें मजपासून ऐक. २.

अपैशून्यं दयाऽक्रोधश्चापल्यं धृतिरार्जवम् ।
तेजोऽभयमहिंसा च क्षमा शौचममानिता ॥ ३ ॥
इत्यादि चिन्हमाद्याया आसुर्याः शृणु सांप्रतम् ।
अतिवादोऽभिमानश्च दर्पो ज्ञानं सकोपता ॥ ४ ॥
आसुर्या एवमाद्यानि चिन्हानि प्रकृतेर्नृप ।
निष्ठुरत्वं मदो मोहोऽहंकारो गर्व एव च ॥ ५ ॥
द्वेषो हिंसाऽदया क्रोध औद्धत्यं दुर्विनीतता ।
आभिचारिककर्तृत्वं क्रूरकर्मरतिस्तथा ॥ ६ ॥
अविश्वासः सतां वाक्येऽशुचित्वं कर्महीनता ।
निन्दकत्वं च वेदानां भक्तानामसुरद्विषाम् ॥ ७ ॥
मुनिश्रोत्रियविप्राणां तथा स्मृतिपुराणयोः ।
पाखण्डवाक्ये विश्वासः संगतिर्मलिनान्मनाम् ॥ ८ ॥
सदम्भकर्मकर्तृत्वं स्पृहा च परवस्तुषु ।
अनेककामनावत्त्वं सर्वदाऽनृतभाषणम् ॥ ९ ॥
परोत्कर्षासहिष्णुत्वं परकृत्यपराहतिः ।
इत्याद्या बहवश्चान्ये राक्षस्याः प्रकृतेर्गुणाः ॥ १० ॥
शठवृत्तीचा अभाव, दया, अक्रोध, चपलता, धैर्य, सरळपणा, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, शौच, मानाचा अभाव इत्यादि पहिल्या [दैवी] प्रकृतीचें चिन्ह आहे. आतां आसुरीचे चिन्ह ऐक. अतिभाषण, अभिमान, गर्व, ज्ञान, क्रोधयुक्तता, इत्यादि हीं आसुरी प्रकृतीची चिन्हें आहेत. निष्ठुरता, मद, मोह, अहंकार, गर्व, द्वेष, हिंसा, दयाहीनता, क्रोध, उद्धटपणा, विनयहीनता, चेटूक करणे, क्रूर कर्माची आवड, सज्जनांच्या शब्दांवर अविश्वास, अशुचित्व, कर्महीनता, वेदांची, भक्तांची, देवांची, ऋषींची, श्रुतिपारंगत ब्राह्मणांची, तशीच स्मृतींची व पुराणांची निंदा करणे, पाखंड वाक्यांवर विश्वास, मलिनचित्त मनुष्यांची संगति, दंभयुक्त कर्म करणे, परवस्तूचा अभिलाष, अनेक इच्छा असणे, सर्वदा असत्य भाषण करणे, परोत्कर्षासहिष्णुत्व, दुसर्‍यांच्या कृत्यामध्ये विघ्न आणणे इत्यादि आणि इतरहि कित्येक राक्षसी प्रकृतीचे गुण आहेत. ३-१०.

पृथिव्यां स्वर्गलोके च परिवृत्य वसन्ति ते ।
मद्‌भक्तिरहिता लोका राक्षसीं प्रकृतिं श्रिताः ॥ ११ ॥
राक्षसी प्रकृतीचा आश्रय केलेले हे लोक मद्‌भक्तिरहित होत्साते पृथ्वी आणि स्वर्गलोक यांमध्ये फेर्‍या घालीत राहतात. ११.

तामसीं ये श्रिता राजन्यान्ति ते रौरवं ध्रुवम् ।
अनिर्वाच्यं च ते दुःखं भुञ्जते तत्र संस्थिताः ॥ १२ ॥
हे राजा, जे तामसी प्रकृतीचा आश्रय करतात ते निरंतर रौरवाप्रत जातात. तेथे राहून ते वर्णन करण्यास अशक्य अशा प्रकारचे दुःख भोगतात. १२.

दैवान्निःसृत्य नरकाज्जायन्ते भुवि कुब्जकाः ।
जात्यन्धाः पङ्‌गवो दीना हीनजातिषु ते नृप ॥ १३ ॥
हे नृपा, दैवयोगाने नरकापासून सुटले म्हणजे ते पृथिवीमध्ये कुब्ज, जात्यंध, पंगु, दीन असे हीन जातींत उत्पन्न होतात. १३.

पुनः पापसमाचारा मय्यभक्ताः पतन्ति ते ।
उत्पतन्ति हि मद्‌भक्ता यां कांचिद्योनिमाश्रिताः ॥ १४ ॥
पुन्हां पाप आचरण करणारे व माझ्या ठिकाणी भक्ति नसलेले ते पतन पावतात. जे माझे भक्त असतात ते कोणत्याहि योनीचा आश्रय केलेले असले तरी श्रेष्ठ स्थिति पावतात. १४.

लभन्ते स्वर्गतिं यज्ञैरन्यैर्धर्मैश्च भूमिप ।
सुलभास्ताः सकामानां मयि भक्तिः सुदुर्लभा ॥ १५ ॥
हे भूपा, यज्ञांनी व इतर धर्मकृत्यांनी ते स्वर्गति पावतात. इच्छायुक्त कर्म करणारांना [ सकामानां ] या स्वर्गादि गति सुलभ आहेत, पण माझे ठिकाणी भक्ति जडणें दुर्लभ आहे. १५.

विमूढा मोहजालेन बद्धाः स्वेन च कर्मणा ।
अहं हन्ता अहं कर्ता अहं भोक्तेति वादिनः ॥ १६ ॥
अहमेवेश्वरः शास्ता अहं वेत्ता अहं सुखी ।
एतादृशी मतिर्नॄणामधः पातयतीह तान् ॥ १७ ॥
मोहजालानें मोहित झालेले, स्वतःच्या कर्माने बद्ध झालेले, मी मारणारा--मी कर्म करणारा–व मी फल भोगणारा असें म्हणणारे, मीच ईश्वर आहें, शास्ता आहे, ज्ञानी आहे, सुखी आहे इत्यादि प्रकारची बुद्धि या मनुष्यांना खाली पाडते. १६-१७.

तस्मादेतत्समुत्सृज्य दैवीं प्रकृतिमाश्रय ।
भक्तिं कुरु मदीयां त्वमनिशं दृढचेतसा ॥ १८ ॥
म्हणून ही बुद्धि सर्वथा टाकून देऊन दैवी प्रकृतीचा आश्रय कर, तूं सतत दृढ अतःकरणाने माझी भक्ति कर. १८.

सापि भक्तिस्त्रिधा राजन्सात्त्विकी राजसीतरा ।
यद्देवान्भजते भक्त्या सात्त्विकी सा मता शुभा ॥ १९ ॥
हे राजन, ही भक्ति सात्त्विकी, राजसी आणि तामसी ) अशी तीन प्रकारची आहे. जिच्या योगाने मनुष्य भक्तीने देवांची भक्ति करतो ती शुभ भक्ति सात्विकी म्हणतात. १९.

राजसी सा तु विज्ञेया भक्तिर्जन्ममृतिप्रदा ।
यद्यक्षांश्चैव रक्षांसि यजन्ते सर्वभावतः ॥ २० ॥
वेदेनाविहितं क्रूरं साहंकारं सदम्भकम् ।
भजन्ते प्रेतभूतादीन्कर्म कुर्वन्ति कामुकम् ॥ २१ ॥
शोषयन्तो निजं देहमन्तःस्थं मां दृढाग्रहाः ।
तामस्येतादृशी भक्तिर्नृणां सा निरयप्रदा ॥ २२ ॥
जन्म व मरण देणारी भक्ति ती राजसी भक्ति जाणावी. जिच्या योगाने सर्व भावनापूर्वक यक्ष, राक्षस यांचे यजन करतात, वेदांनी विहित नसलेले, क्रूर, अहंकारयुक्त व दंभयुक्त कर्म करतात, प्रेत-भूते इत्यादिकांची भक्ति करतात, कामुक कर्म करतात, स्वतःचा देह व आंत [=देहामध्यें ] स्थित असलेला मी यांना सुकवितात, दृढ आग्रहाने युक्त असतात, ती या प्रकारची भक्ति तामसी होय. ही मनुष्यांना नरक देणारी आहे. २०-२२.

कामो लोभस्तथा क्रोधो दम्भश्चत्वार इत्यमी ।
महाद्वाराणि वीचीनां तस्मादेतांस्तु वर्जयेत् ॥ २३ ॥
काम, लोभ, क्रोध आणि दंभ हे चार वीचिनामक नरकांचे मोठे दरवाजे आहेत म्हणून यांना वर्ज कर. २३.

इति श्रीमद्‌गणेशगीता सूपनिषदर्थगर्भासु
योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे
गजाननवरेण्यसंवादे उपदेशयोगो नाम दशमोऽध्यायः ॥
उपदेशयोग नामक दहावा अध्याय समाप्त ॥ १० ॥


॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||


Download pdf (संपूर्ण गीता )
मागचा आध्याय
गणेश गीता (मुख्य पान )
पूडचा आध्याय
Main Page(मुख्य पान )