।श्री गणेशाय नमः।
श्री स्वामी सामर्थाय नमः ।
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना।।१।।
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका।।२।।
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा ।
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना।।३।।
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका।।४।।
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें।।५।।
ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती ।
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें।।६।।
पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा।।७।।
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी।।८।।
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे ।
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें।।९।।
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे।।१०।।
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे।।११।।
ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें ।
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे।।१२।।
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा।।१३।।
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां।।१४।।
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही ।
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें।।१५।।
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें।।१६।।
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती।।१७।।
॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
|| श्री स्वामी समर्थापर्ण मस्तु||